राज्याचे लक्ष लागून असलेल्या कामठी नगर परिषदेच्या निवडणुकीचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. २ डिसेंबरला पार पडलेले मतदान आणि आज उर्वरित प्रभागांसाठी झालेल्या मतदानानंतर आता सर्वांच्या नजरा उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. या निवडणुकीत भाजपचे दिग्गज नेते आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच माजी मंत्री सुरेखाताई कुंभारे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली असून, शहराचा 'किंग' कोण ठरणार, याचा फैसला उद्या होणार आहे