अकोला: दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांची जिल्ह्यातील २४ ठिकाणी आकस्मिक नाकाबंदी, ७८ वाहनांवर कारवाई
Akola, Akola | Nov 11, 2025 अकोला, दि. ११ नोव्हेंबर : दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अकोला जिल्ह्यात १० नोव्हेंबर रोजी रात्री १० ते १२ वाजेदरम्यान आकस्मिक नाकाबंदी करण्यात आली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत २४ नाकाबंदी पॉईंटवर ६५३ वाहनांची तपासणी करून मोटार वाहन कायद्यान्वये ७८ वाहनांवर कारवाई करण्यात आली आणि ३९,३०० दंड वसूल करण्यात आला. ही माहिती अकोला पोलीस विभागाने ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. नागरिकांन