उमरगा: उमरगा - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अणदुर - नळदुर्ग रस्त्यावर भर रस्त्यावरच रुग्णवाहिका जळुन खाक
उमरगा - सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील अणदुर आणि नळदुर्ग दरम्यानच्या रस्त्यावर रुग्णवाहिकेने पेट घेतल्याची घटना दि.१० सप्टेंबर सकाळी ११ वाजता घडली आहे.सुदैवाने कोणतीही जिवितहानी नाही.सदरील रुग्णवाहिका ही फुलवाडी टोलनाक्यावर आपत्कालीन सेवेसाठी तैनात होती. महामार्गावरुन जात असताना रुग्णवाहिकेने घेतला अचानक पेट, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.आगीच्या कारणामुळे महामार्गावरील वाहतुक काही वेळ ठप्प झाली होती.