वंजारी व बंजारा या जाती वेगळ्या आहेत” असं म्हणत धनंजय मुंडे यांनी कालच्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला आहे
Beed, Beed | Sep 16, 2025 वंजारी व बंजारा या जाती वेगळ्या आहेत” असं म्हणत धनंजय मुंडे यांनी कालच्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला आहे. “बंजारा समाजाने भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर खूप प्रेम केलं आहे. त्याच भावनेतून मी ते वक्तव्य केलं होतं”, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. तसेच दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत अशी भूमिकाही त्यांनी मांडली. “बंजारा व वंजारी या जाती म्हणून वेगवेगळ्या आहेत. बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत.