मानगाव: माणगाव तालुक्यातील भादाव येथे कॉलेजमध्ये रोबोटिक्स लॅब व ए. आय. सेंटर या अत्याधुनिक विद्यालयाच्या नामकरण सोहळा
Mangaon, Raigad | Oct 16, 2025 आज गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास माणगाव तालुक्यातील भादाव येथील एस. एस. निकम इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये वरदा सुनील तटकरे रोबोटिक्स लॅब व ए. आय. सेंटर’ या अत्याधुनिक विद्यालयाच्या नामकरण सोहळ्यास खासदार सुनील तटकरे हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांशी मनमोकळा संवाद साधला व सर्वांना दिपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणप्रणाली आणि नव्या पिढीला भविष्यातील कौशल्यांनी सक्षम करण्याच्या दृष्टीने हे केंद्र माणगाव सह परिसरातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. निकम यांनी इंग्रजी माध्यमाच्या शैक्षणिक दालनाची सुरुवात करून ग्रामीण भागात आधुनिक शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. या शाळेचा आणि महाविद्यालयाचा निकाल नेहमीच १०० टक्क्यांच्या आसपास राहिला आहे, हे अत्यंत समाधानकारक आहे.