अकोला: बुद्धाच्या मार्गाने चालल्यास जीवन यशस्वी; भंते बी. संघपाल, महाथेरो, दिग्रस खुर्द येथे ग्रंथ समारोप संपन्न
अकोल्याच्या दिग्रस खुर्द येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचा समारोप उत्साहात पार पडला. भंते बी. संघपाल यांनी प्रवचनात सांगितले की, “बुद्धाच्या मार्गाने चालाल तर मानवी जीवन यशस्वी आणि सुखी होईल.” कार्यक्रमात धम्मध्वजारोहण, ग्रंथ पठण, विश्लेषण आणि भोजनदानाचा समावेश होता. या आयोजनात बोधिसत्व बुद्धविहार समिती, महामाया महिला संघ, जय बलभीम आखाडा आणि न्यू आनंद क्लब या ग्रंथ समारोप संपन्न झाला.