सेनगाव: क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर कदापिही खपवून घेतले जाणार नाही,रविकांत तुपकर
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष यांच्यासह अन्य दोघांवर सेनगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी ॲट्रॉसिटी व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेऊन अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर कदापिही खपून घेतले जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच जशास तसे उत्तर देऊ असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.