रोहा: रोहा नगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुशंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांची भाजपा कार्यालय भेट
Roha, Raigad | Nov 28, 2025 रोहा नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज रोहा भाजपा कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांनी उमेदवारांना सदिच्छा भेट देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपा तालुका अध्यक्ष अमित घाग, सरचिटणीस कृष्णा बामणे, परेश चितळकर, महिला मोर्चा अध्यक्षा रिया कासार, जिल्हा चिटणीस श्रद्धा घाग, महिला मोर्चा शहर अध्यक्षा मृणाल पेंडसे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नरेश कोकरे, उमेदवार रोशन चाफेकर, शहर अध्यक्ष पदाचे उमेदवार सुमित रिडबूल, माजी जिल्हा संयोजक पी. व्ही. सनलकुमार, उमेदवार ज्योती सनलकुमार, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अनिल घरजाले, जिल्हा संयोजक वैभव कुलकर्णी, सचिन मोरे, कामगार मोर्चा अध्यक्ष संदेश बामणे, आयटी सेल निखील बोरवले, सोशल मीडिया राकेश चाफेकर, माजी जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा जयश्री ताई भांड, उपाध्यक्षा शिंदे उपस्थित होते.