औसा- ऐतिहासिक घटनांची साक्ष देणाऱ्या औसा किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक कामांना गती देण्यात येईल. या किल्ल्याच्या डागडुजीचे काम पूर्ण करून पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली.औसा किल्ला संवर्धनासाठी करण्यात आलेल्या कामांची, तसेच किल्ल्याच्या परिसराची ॲड. शेलार यांनी पाहणी केली.