आज सोमवारी सुतारवाडी येथील गीताबाग कार्यालयात सुधागडमधील अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासाभिमुख विचारसरणीवर आणि पक्षनेतृत्वावर विश्वास व्यक्त करून पक्षात प्रवेश केला. खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले की, पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांचे स्वागत करत, त्यांना पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सुधागड हा राष्ट्रवादीचा एके काळीचा बालेकिल्ला राहिला आहे. सुधागडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक विकास कामे केली आहेत. त्यावर विश्वास ठेवत आज आपण सर्वांनी पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे पक्षाची ताकद अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत, यापुढेही शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी भावना व्यक्त केला.