जालना: बदनापूर येथे एमआयडीसीचा मार्ग मोकळा होणार; विकासकामांना गती मिळेल – आमदार नारायण कुचे
Jalna, Jalna | Jul 10, 2026 बदनापूर मतदारसंघातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रस्तावित एमआयडीसी (MIDC) लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी व्यक्त केला. राज्यात महायुतीचे सरकार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि युवकांच्या हिताचे निर्णय प्राधान्याने घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार कुचे यांनी सांगितले की, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत आहे. शेती, सिंचन,