भंडारा जिल्ह्यातील पाहुणी बसस्थानकावर एसटी बस थांबत नसल्याच्या कारणावरून संतप्त विद्यार्थ्यांनी बससमोर बसून जोरदार ठिय्या आंदोलन केले. या मार्गावर बस वेळेवर येत नसल्याने व थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकदा दोन-दोन तास वाट पाहूनही बस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, वेळेत शाळेत न पोहोचल्यामुळे शिक्षकांकडूनही त्यांना विचारणा केली जाते. प्रशासनाच्या या निष्काळजी कारभाराला कंटाळून अखेर विद्यार्थ्यांनी भररस्त्यात