दिग्रस: अतिवृष्टीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांची दिग्रस तहसील कार्यालयात गर्दी, यादीत नाव पाहण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा
सन २०२५ या चालू वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे दिग्रस तालुक्यातील पाचही महसूल मंडळांमध्ये अतोनात नुकसान होऊन तब्बल २३ हजार ४०० हेक्टर जमिनीवरील वेगवेगळ्या पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये कापूस, तूर आणि सोयाबीन या प्रमुख पिकांचे सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १८ हजार ५०० रुपये अनुदान दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती.