अमरावती: पुरग्रस्तांना मदतीचे तीन ट्रक रवाना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते हिरवी झेंडी
राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागात मदत म्हणून पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे जीवनावश्यक साहित्य रवाना करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्याच्या तीन ट्रकला हिरवी झेंडी दाखविली. तसेच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यावतीने दिवाळीनिमित्त नागरिकांना देण्यात येणारा शिधाचे वाटप केले.