सातारा: साताऱ्यातील पंचपाळी हौद येथे वसुबारस उत्साहात साजरा, महिलांनी केली गाय व वासराची पूजा
Satara, Satara | Oct 17, 2025 साताऱ्यातील पंचपाळी हौद येथे वसुबारस उत्साहात साजरा करण्यात आला, पंचपाळी हौद येथे पूजनासाठी शेतकऱ्यांनी गाय वासरू आणून ठेवले होते,आज, १७ ऑक्टोबर २०२५ रोजी, वसुबारस हा सण उत्साहात साजरा होत आहे, जो दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवाचा पहिला दिवस आहे. या दिवशी घरातील महिला गाईची तिच्या वासरासोबत पूजा करतात आणि भरपूर कृषी उत्पादन, मुलाबाळांचे आरोग्य व सुख लाभावे यासाठी प्रार्थना करतात. दरम्यान आज पासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात होते.