उमरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने आजरोजी वीस नगरसेवक पदासह नगर अध्यक्ष पदाचे निकाल तहसील कार्यालय येथून जाहीर झाले असून यात 18 नगरसेवकासह नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणत राष्ट्रवादीचे मा. आ. बापूसाहेब देशमुख यांचे शिरीष व कैलास ह्या दोघा छावांनी उमरी हा आपला गड कायम राखले असून यावेळी विरोधी काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांची चांगलीच धूळधाण उडाली आहे.