रामटेक: रामटेक शहरातील सर्वच पेट्रोल पंप ठप्प; ग्राहकात चिंता
Ramtek, Nagpur | Mar 25, 2026 आखाती देशातील युद्धाच्या झळा देशाच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्या आहेत. मागील काही दिवसांपासून एलपीजी गॅसच्या तुटवडा झाला. ग्राहकांच्या रांगा गॅस कंपनी समोर लागल्या आता मागील आठवड्यापासून पेट्रोल डिझेलचाही तुटवडा जाणवत आहे. ग्राहक रोज पेट्रोल पंपावर रांगा लागू लागले आहेत. नसल्यास चकरा मारू लागले आहेत.रामटेक शहरालगतचे पाचही पेट्रोल पंप बुधवार दिनांक 25 मार्चला सायंकाळपर्यंत बंद स्थितीत आहेत. त्यामुळे वाहन धारकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.