मुरुड: अकोल्यातील दोन पर्यटकांचा काशीद समुद्रकिनारी पाण्यात बुडून मृत्य
शिक्षकासह विद्यार्थ्याचा मृत्यू
Murud, Raigad | Nov 8, 2025 मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी शनिवारी (दि. ८ नोव्हेंबर) संध्याकाळी घडलेल्या दुःखद दुर्घटनेत अकोला येथून शैक्षणिक सहलीसाठी आलेल्या दोन पर्यटकांचा — एका शिक्षकासह एका विद्यार्थ्याचा — पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आणखी एक विद्यार्थी पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे. अकोला येथील ‘शॉरवीन क्लासेस’ या शिक्षण संस्थेतील १२ विद्यार्थी व ३ शिक्षक अशी १५ जणांची मंडळी शनिवारी सकाळी काशीद समुद्रकिनारी सहलीसाठी आली होती. दुपारनंतर काही विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते.