पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी 19 जानेवारी ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना २१ जानेवारी रोजी नागपुरात जामठा येथील व्हिसीएच्या स्टेडिअमवर होणार आहे. यामुळे या परिसरात व वर्धा मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी नागपूर शहर पोलिस वाहतूक शाखेने वाहनांचे मार्ग व पार्किंगच्या जागा निश्चित केल्या आहेत. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी दिली आहे.