मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयातच गरजू नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विविध योजनांसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या शपथपत्रांवर सही-शिक्क्यासाठी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून कैलास पाटील हे थेट एका लाभार्थी महिलेकडून रोख रक्कम स्वीकारताना व्हिडिओमध्ये रंगेहाथ कैद झाले आहेत. गोरगरिबांकडून पैसे उकळण्याचा हा व्हिडिओ गुरूवारी १६ ऑक्टोबर दुपारी ४ वाजेच्या सुमारास सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे.