वणी-मारेगाव मार्गावरील लालपुलियापरिसरात सोमवार दि. 12 जानेवारी 2026 रात्री घडलेल्या अपघातात भरधाव बोलेरो पिकअप वाहनाच्या धडकेत पायदळ जाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील मृतकाचे नाव चेंडकु रामभाऊ आत्राम (52), रा. पळसोणी, ता. वणी असे आहे. याबाबत वैभव चेंडकु आत्राम (22) यांनी दिलेल्या फिर्यादवरून वणी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालक विरुद्ध कलम 281, 106(1) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.