आज शनिवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास माणगाव येथे शिवसेना उबाठा गटाचे पोलादपूर तालुका प्रमुख अनिल मालुसरे आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक उतेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांना नवनियुक्तीपत्र प्रदान करून राष्ट्रवादी परिवारात स्वागत केले. अनिल मालुसरे आणि दीपक उतेकर यांच्या प्रवेशामुळे भविष्यात पक्षाची ताकद अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत सर्वांना पक्षाची ध्येय, धोरणे आणि विचारधारा याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शन करताना आज कुणबी भवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आनंदाची दिवाळी साजरी करत आहे.