औंढा नागनाथ: नागेशवाडी,देवळा येथे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकाची केली पाहणी
औंढा नागनाथ तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याच्या सोयाबीन तूर कापूस हळद पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे या नुकसानग्रस्त पिकाची हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिनांक 17 सप्टेंबर बुधवार रोजी सायंकाळी साडेचार वाजे दरम्यान देवळा तसेच नागेशवाडी येथे शेतकरी कोंडबा राजाराम बेले यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. यादरम्यान शेतकऱ्यांनी अतिवृष्टीने हाता तोंडाशी आलेले पीक गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे त्यामुळे तात्काळ मदतीची मागणी केली.