वनपरिक्षेत्र चिचपल्ली अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील चिचाळा येथे मंगळवारच्या रात्री तीन अस्वलींनी गावात भटकंती केली. त्यातील एका अस्वलीने रात्रभर धुमाकूळ माजविला. त्यात चिचाळा येथील एका घरातील सुरेश काशिनाथ कुनघाडकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना मूलमध्ये प्राथमिक उपचार करून नागपूर येथे पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. या घटनेने चिचाळा येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून धुमाकूळ माजविणाऱ्या अस्वलीला जेरबंद करण्यात यश मिळवले. तिला जंगल