मुदखेड तालुक्यातील मौजे इजळी येथे मयताचे शेतामध्ये दि 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी चार ते सहाच्या दरम्यान यातील मयत दत्तराम मारोती मुंगल वय 65 वर्षे यांनी शेतीच्या सततच्या नापिकीला व बँकेच्या कर्जाला कंटाळून स्वतःच्या शेतामधील लिंबाचे झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी खबर देणार गोविंद मुंगल यांनी दिलेले खबरीवरून आज सायंकाळी मुदखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मूर्तीची नोंद झालेली असून पुढील तपास पोलीस रेकॉर्ड झुंजारे हे आज करीत आहेत.