औंढा नागनाथ: ऊस तोडीचे पैसे परत मागितल्यावरून जिवे मारण्याची धमकी असोला शिवारातील घटना,तिघावर औंढा नागनाथ पोलिसांना गुन्हा दाखल
औंढा नागनाथ तालुक्यातील कपीश्वर साखर कारखाना असोला शिवारात ऊस तोडीचे पैसे परत का मागतोस या कारणावरून एकास तिघांनी संगणमत करून मोबाईल वरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे या प्रकरणी श्रीराम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलेश पालेवार, छाया पालेवार दोघे व अन्य एक जण ज्याचे नाव गाव माहित नाही यांच्यावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिनांक सात नोव्हेंबर शुक्रवार रोजी रात्री पावणे आकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला