नागपूर ग्रामीण: दवलामेटी परिसरात बंद घरात वृद्ध दांपत्याचे मृतदेह आढळल्याने खळबळ,
वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दवलामेटी येथील म्हाडा कॉलनीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका बंद घरात वृद्ध दांपत्याचे मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गंगाधर भोंगाडे व कौशल्या भोंगाडे असे मृतकाचे नाव सांगण्यात आले आहे .