जालना: रायझिंग जालना प्रकरणाला नवे वळण : व्हिडिओ शूट करणारा युवक निर्दोष? डान्स करणाऱ्या युवकांचा शोध सुरू
Jalna, Jalna | May 6, 2026 जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरातील “रायझिंग जालना” येथे काही युवकांनी संरचनेवर चढून मोठ्या आवाजात डान्स करत स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अस्मिता मित्तल यांच्या आदेशानुसार चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस तपासात या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून व्हिडिओ शूट करणारा युवक आणि प्रत्यक्ष संरचनेवर चढून डान्स करणारे युवक यांचा एकमेकांशी कोणताही स