नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक बाबीसाठी विभागप्रमुख दर्जाचे नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रत्येक महानगरपालिकेकरीता मुख्य निवडणूक निरीक्षक तसेच निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.