नगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध पत्रक प्रकरणावर भिंगारमध्ये कडकडीत बंद
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध आक्षेपार्ह पत्रके भिरकावल्याच्या घटनेने शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निषेधार्थ आज (ता. ११) संपूर्ण भिंगार शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. भिंगार-आलमगीर येथील आरोपी फरीद सुलेमान खान याने विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रके भिरकावल्याने नागरिक, समाजप्रेमी व आंबेडकरी बांधवांमध्ये तीव्र रोष व्यक्त