अचलपूर: दुल्हे रहेमान शहा दर्गा परिसरात दुचाकी चोरी; अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल
शहरातील दुल्हे रहेमान शहा दर्गा परिसरात उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी अब्दुल जावेद अब्दुल रशीद (वय ४३, रा. थुगाव पिंपरी, ता. चांदूरबाजार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मोटारसायकल (क्र. एमएच २७ बीएन २९६२) दुल्हे रहेमान शहा दर्गा, अचलपूर येथे उभी केली होती. १९ सप्टेंबर रोजी रात्री सुमारास ९ वाजता दरम्यान अज्ञात चोरट्याने नमूद दुचाकी (किंमत अंदाजे ३० हजार रुपये) चोरुन नेली. या घटनेबाबत