जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांच्या वतीने,जिल्हा अध्यक्ष सतीश बिडकर ,शहराध्यक्ष आशिष पिल्ले ,तालुका अध्यक्ष अमित यादव यांच्या उपस्थितीत बच्चू भाऊंच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर आज दि 12 डिसेंबर 12 वाजता कायदेशीर आंदोलन करण्यात आले.यावेळी दिव्यांग बांधवांच्या मूलभूत हक्कांसाठी व शासनाकडील प्रलंबित मागण्या तात्काळ मंजूर करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.