अकोला: कुरणखेड येथील वंदे मातरम् बचाव पथकाचे हरणाच्या पिलाला नवे जीवनदान!
Akola, Akola | Nov 2, 2025 कुरणखेड (नवीन वस्ती) येथे काल 1 नोव्हेंबर रोजी एका हरणाच्या पिलावर 4 ते 5 कुत्र्यांनी हल्ला केला. नजर अली जहांगीरदार यांनी मानवतेचा दाखला देत पिल्लाला आपल्या घरी ठेवले आणि तत्काळ वंदे मातरम् आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे अध्यक्ष उमेश आटोटे यांना माहिती दिली. उमेश आटोटे यांनी वन विभागाशी संपर्क साधून पिल्ल्याची काळजी घेत रात्रभर त्याचे संगोपन केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संदीप साबळे व सुनील कल्ले यांच्या आदेशानुसार 2 नोव्हेंबर रोजी वन कर्मचारी अरुण शेलार यांच्या ताब्यात दिलं.