माकणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढलेला येवा लक्षात घेऊन निम्न तेरणा प्रकल्प प्रशासनाने आज दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी सायं. 5.45 वा. महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी एकूण २ वक्रद्वारे प्रत्येकी 10 सें.मी. ने उघडण्यात आली आहेत. यामुळे तेरणा नदीपात्रात तब्बल 767 क्यूसेक्स (21.71 क्यूमेक्स) इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे