नागपूर ग्रामीण: कोराडी येथील तरुणाचा रेल्वे अपघातात मृत्यू, अपघात की घातपात पोलिसांचा तपास सुरू
रेल्वे अपघातात एका २८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास भरतवाडा येथील रेल्वे पटरीजवळ एका इसमाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.तपासादरम्यान मृत व्यक्तीची ओळख लक्ष्मीकांत सुरज जामदार वय २८ वर्षे, राहणार कोराडी अशी पटली आहे.