वणी तालुक्यात सन 2024-25 व 2025- 26 या कालावधीत शासनाकडून एकूण ५,२६० घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी केवळ ८६७ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून तब्बल ४,३९३ घरकुलांचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. शासन निर्णयानुसार घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती पुरवठा करणे बंधनकारक असताना प्रशासनाकडून रेतीची उपलब्धता करून दिली जात नसल्याने ग्रामीण भागातील गरीब लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.