जालना: खरेदी केलेली जमीन परस्पर दुसर्याला विकल्याचा आरोप; भागीदारी संस्थेची फसवणूक झाल्याची तक्रार; गुन्हा दाखल
Jalna, Jalna | May 30, 2026 तब्बल 1 कोटी 34 लाख रुपयांना खरेदी केलेली जमीन नंतर पुन्हा दुसर्या व्यक्तीच्या नावावर विक्री करून फसवणूक केल्याचा आरोप करत जालना येथील व्यावसायिकाने संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. शनिवार दि. 30 मे 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गोतमसिंग सोहनसिंग मुनोत रा. प्रियंका रेसिडेन्सी, मंठा चौफुली, जालना यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची फसवणूक झाल्याचा आरोप केला.