नागपूर ग्रामीण: इंधन बचतीचा संदेश: नागपूर झेडपीचे सीईओ विनायक महामुनी पुन्हा कार्यालयात पायी
शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी मागील सोमवारप्रमाणे या सोमवारीही इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलले. त्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानापासून ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंतचा प्रवास पायी केला