मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह अनेकांच्या उपस्थितीत रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला
Beed, Beed | Sep 17, 2025 बीडकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. अनेक दशकांपासून ज्याची आतुरतेने प्रतीक्षा होती, त्या रेल्वे सेवेची आज बीड जिल्ह्यातून प्रत्यक्ष सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी बीड रेल्वे स्थानकावरून पहिल्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.परळी – बीड – अहिल्यानगर असा एकूण 261 किलोमीटरचा रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे. यातील पहिला टप्पा आज बीड ते अहिल्यानगरपर्यंत सुरू करण्यात आला असून हा टप्पा अंदाजे 160 किलोमीटरचा आहे.