माण: माढा लोकसभा मतदारसंघात २१ गावांना डिसेंबर २०२६ पर्यंत मिळणार मोबाइल कनेक्टिव्हिटी; सातारा जिल्ह्यातील चार गावांचा समावेश
Man, Satara | Sep 16, 2025 माढा लोकसभा मतदारसंघात असलेल्या सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विशेष करून डोंगराळ आणि दुर्गम भागात असलेल्या गावांमध्ये मोबाईल नेटवर्क समस्या मोठी होती. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी यासंदर्भात कार्यवाही केली जात असल्याचे सांगून डिसेंबर २०२६ अखेर या गावांना मोबाईल कनेक्टिव्हिटी देण्याचा शब्द दिला आहे. या संदर्भात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मंगळवारी दुपारी पावणेतीन वाजता समाज माध्यमावर माहिती दिली आहे.