मेमरी गुरु' असल्याचे भासवून एका व्यक्तीने शेअर मार्केटमधील आकर्षक योजनांच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक केली. ही घटना पिंपरीतील रत्ना हॉटेलमध्ये घडली.ज्ञानप्रकाश साहू असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी खिलेश जीवाराम अडभैया (वय ४२, आकुर्डी) यांनी शुक्रवारी (दि. ३१) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.