भंडारा येथील हनुमान मंदिरात श्रीमद् भागवत महापुराणाच्या सांगतेनिमित्त गोपाळ काला आणि महाप्रसादाचे भव्य आयोजन दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान करण्यात आले. या भक्तिमय वातावरणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला. भक्तिगीत, देवाचे नामस्मरण आणि सामूहिक महाप्रसादाच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सर्व भक्तांनी परम आनंद आणि भक्तीचा अनुभव घेतला. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.