खामगाव: खामगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित मदत द्या!
शिवसेनेचे उपविभागीय अधिकारी डॉ पुरी यांच्या मार्फत निवेदन
अतिवृष्टीने खामगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे तसेच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.