सातारा: साताऱ्यात दुर्गा मातेची मोठ्या भक्तीभावाने प्रतिष्ठापना
Satara, Satara | Sep 22, 2025 सातारा शहरात सुमारे १०० दुर्गा मंडळांनी आणि तालुका व जिल्ह्यात दुर्गा माता मंडळांनी दुर्गामातेची प्रतिष्ठापना केली. मोठ्या भक्तीमय वातावरणात पारंपारिक पद्धतीने मिरवणूका सोमवारी सकाळी मुहूर्तावर ११ वाजता काढून भक्तांनी सहभाग घेवून प्रतिष्ठापना करण्यात आली. सातारा शहरात राजवाडा बसस्थानक येथून दुर्गा मातेची मंडळांनी मिरवणूक काढली होती. त्या मिरवणूकीत मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. सायंकाळी दुर्गेच्या आगमनाचा उत्साह पहायला मिळत होता.