चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुधानोरा गावाजवळ बुधवारी १:४५ सुमारास घडली. बाबासाहेब कारभारी आरगडे (वय. ३२, रा. बिडकीन) व बाबासाहेब सोलट (वय. ३०, रा. शेंदुरवादा, ता. गंगापूर) अशी जखमींची नावे आहेत. ते दोघे दुचाकीने (एमएच २० बीडी ८९४६) गंगापूर येथून बिडकीनला जात असताना हा अपघात झाला.