लाखांदूर: वाढीव मानधनासाठी शेकडो दिव्यांग धडकले तहसील कार्यालयावर; दिव्यांग संघटनेतर्फे विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिव्यांग बांधवांच्या मानधनात वाढ झाली असताना लाखांदूर तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधवांना वाढीव 1000 रुपये मानधनाचा लाभ मिळाला नाही त्यामुळे लाखांदूर तहसील कार्यालयाच्या या हलगर्जीपणामुळे शेकडोसन तप्त दिव्यांग बांधव तारीख 24 नोवेंबर रोजी या वाढीव मानधनाचा लाभ मिळण्याच्या मागणीसह अन्य मागण्या घेऊन लाखांदूर तहसील कार्यालयावर धडकले यावेळी लाखांदूर तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.