वणी: नैराश्येतून एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या, राजूर कॉलरी येथील घटना
Wani, Yavatmal | Oct 22, 2025 नैराश्येतून एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील राजूर (कॉ.) येथे बुधवार दि. २२ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अविनाश राहुल धोटे वय अंदाजे ३३ ते ३४ वर्षे असे या गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. सर्वत्र दिवाळीचा सण साजरा होत असतांना या तरुणाने मृत्यूचा फास गळ्याभोवती आवळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.