जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पाईप कंपनीत काम करत असताना हा हल्ला करण्यात आला असून, या घटनेत भूषण रामभाऊ पाटील (वय ३४) हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत मंगळवारी ७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.