दिग्रस तालुक्यातील हरसूल फाट्याजवळ आज सायंकाळी भीषण अपघात घडला. नागपूर डेपोची एसटी बस क्र. MH-14 LX-8939) नागपूरहून नांदेडकडे प्रवासी घेऊन जात असताना हरसूल फाट्याजवळ समोरून येणाऱ्या बुलेट दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात बुलेटवरून प्रवास करणारे राहुल डोल्हाकर व अजय पारधी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दि. १९ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत दोन्ही जखमींना दिग्रस येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.