अमरावती: अमरावतीत दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शनासाठी जोरदार तयारी, मनपा आ. सौम्या शर्मा यांनी घेतली सां. भवनाची पाहणी
अमरावती महानगरपालिकेतर्फे नागरिकांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त भव्य “दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शन” आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक १६ ते २१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान सांस्कृतिक भवन, अमरावती येथे भव्य स्वरूपात पार पडणार असून, या आयोजनाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर आज दिनांक १३ ऑक्टोंबर,२०२५ रोजी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांस्कृतिक भवन येथे भेट देऊन संपूर्ण परिसराची सखोल पाहणी केली.